कराडजवळ कंटेनरने तिघांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराडजवळील रेठरे बुद्रक गावातील पहाटे व्यायामास गेलेल्या चौघांपैकी तिघांना भरधाव आलेल्या कंटेनरने चिरडले असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कराड ते तासगाव रस्त्यावर शेणोली येथील पोल्ट्रीजवळ पहाटे ही दुर्देवी घटना घडली. या अपघातामध्ये दीप ज्ञानू गायकवाड (वय 45), प्रवीण हिंदुराव गायकवाड (40), विशाल धोंडीराम गायकवाड (30, तिघे रा. सम्राटनगर, शेणोली, ता. कराड) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी पहाटे चौघेजण व्यायामाला घराबाहेर पडले होते. ते रस्त्याच्या एकाबाजूने चालत होते. यामधील तिघांना भरधाव कंटेनरने चिरडले. शेणोलीतील साबळे वाडीपासून शेणोलीच्या रस्त्यात ही घटना घडली. या चौघांमधील बाजूला व्यायाम करणारा रोहित आनंदराव गायकवाड सुदैवाने बचावला आहे.