
ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर घडली. इम्रान सलीम जकारिया (वय 30, रा. मॅजेस्टीक पार्क, वडाची वाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकील जकारिया (वय 43) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दुचाकीस्वार जकारिया बाह्यवळण मार्गावरून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी उंड्री चौकात ट्रकने दुचाकीस्वार जकारिया यांना धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.




























































