पाथरी-माजलगाव महामार्गावर ट्रक-जिपचा अपघात; एकजण जखमी

431

पाथरी-माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर ढालेगावजवळ ट्रक आणि पिकअप जिपचा समोरासमोर अपघात झाल्याने पिकअप चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला बीड येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

पाथरीहून माजलगावकडे जाणारी पिकअप जिप आणि माजलगावकडून पाथरीकडे येणारा ट्रक यांची मंगळवारी पहाटे 4 वाजता समोरासमोर धडक झाली. या अपघातात पिकअप चालक जरीमोद्दीन पठाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पठाण यांना तातडीने बीड येथील रुग्णालयात दाखल केले आहे.  हा अपघात ढालेगाव पासून अर्धा किलोमीटर अंतरावर तुळजाभवानी हॉटेलसमोर झाला. पहाटेच्या सुमारास धुके पडले होते. त्यातच ट्रकचालक मार्गिका सोडून ट्रक चालवत होता. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. या अपघातामुळे वाहतूक बराचकाळ खोळंबली होती.

आपली प्रतिक्रिया द्या