मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात; शहापूरचे चार मजूर जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन ।  शहापूर

रोजीरोटीसाठी घोटी-नाशिकपर्यंत प्रवास करणाऱ्या शहापूरच्या चौघा मजुरांवर शनिवारी काळाने घाला घातला. रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत असलेल्या या चौघांना मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या  कारने चिरडले. या  भीषण अपघातात ते जागीच ठार झाले असून इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सातच्या सुमारास कांबारे फाट्याजवळ हा अपघात घडला.

शहापूर तालुक्यातून नाशिक, घोटी, इगतपुरी, कसारा, खर्डी येथे विविध कामांसाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील कांबारे फाट्यासमोर प्रवासी खासगी वाहनांची वाट पाहत उभे असतात. शनिवारी सकाळीदेखील काही प्रवासी नाशिककडे जाण्यासाठी खासगी वाहनांची वाट पाहत होते. त्याचवेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या इनोव्हा कारचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर धडकली. या अपघातात शहापूर तालुक्यातील श्रीराम पाटोळे (45, शेंद्रुण), दौलत दकणे (36, साकरोली), आदित्य नवगिरे (16, डोळखांब), अब्दुल शेख (55, किन्हवली) हे चारजण जागीच ठार झाले, तर छाया वेखंडे, विद्या नवगिरे, पूजा नरसाळे व जयंत नेरकर हे जखमी झाले.

13 जखमी जखमींची नावे

आदित्य धवकी, सोनल म्हात्रे, किशोर शलाके, मधुनाथ म्हात्रे, चंद्रकांत राहुल, पुंडलिक बापूडणकर, रुचुसा उल्हे, सविता कुरबर, प्रभाकर, दीपिका म्हात्रे, हर्षिता म्हात्रे आणि लालन.