मुंबई- पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, 4 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लोणावळा

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर ट्रक आणि दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. मुंबईकडे सिमेंट घेऊन जाणारा एक ट्रक पुणे लेनवर आला आणि 2 कारवर आदळला. ट्रकच्या धडकेत एक कार जवळपास 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. अपघातामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील अपघाताचे एक्सक्लुझिव फोटो-