
हत्येच्या गुह्यात फरार आरोपी ताब्यात
गाळा खरेदी-विक्रीच्या वादातून एकाची हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अखेर अटक केली. रितिक रवींद्र चौहाण असे त्याचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशला पळून गेला होता. त्याला अटक करून ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
घातक शस्त्रासह तरुणाला अटक
घातक शस्त्रासह तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट-12 ने अटक केली. मोहम्मद राजा सुभाष राय असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, तीन डेबिट कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आदी जप्त केले आहेत. मोहम्मद हा बिहारचा रहिवासी आहे.
हैदराबाद येथून एक जण खासगी ट्रव्हल बसने मुंबईत शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती युनिट-12 च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. पोलिसांनी गोरेगावच्या एका इमारतीजवळ सापळा रचून मोहम्मद रजा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली. शस्त्र प्रकरणी त्याच्याविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.