
मध्य प्रदेश सरकारही लवकरच ‘लव्ह जिहाद’ विरोधात कडक कायदा आणणार आहे. हा एक अजामीनपात्र गुन्हा असेल आणि दोषींना पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल. यासंदर्भात आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक सादर केले जाणार असल्याची माहिती गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.
या कायद्यानुसार लव्ह जिहादसाठी मदत करणाऱयांनादेखील मुख्य आरोपीप्रमाणेच शिक्षा दिली जाईल. विवाहासाठी धर्मांतरण करायला लावणाऱयांनादेखील शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात असेल. स्वतŠच्या इच्छेने धर्म परिवर्तन करून विवाह करण्यासाठी संबंधित व्यक्तीला एक महिना अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. तसेच जबरदस्ती करून व धमकावून केलेला विवाह, ओळख लपवून केलेला विवाह या कायद्यानंतर रद्द मानला जाईल, असे नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे.

























































