जास्त भाडे आकारणाऱ्या 16 खासगी वाहनांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
बेस्टच्या कृती समितीने पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल. अनेक भागात प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. तर काही भागात खासगी वाहनांवर भिस्त आहे. (सर्व फोटो - सचिन वैद्य)

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. एसटी महामंडळ व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने आज काही बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 10 एसटी बसेस पोलीस संरक्षणात पुण्याकडे रवाना करण्यात आल्या.

नगर शहरातून पुण्याकडे जाणाऱया प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेत डेपो मॅनेजर विठ्ठल खेंगारकर यांच्याशी चर्चा करून 10 बसेस पुण्याकडे पोलीस संरक्षणात सोडल्या. एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने काही प्रवाशांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे.

खासगी वाहनचालक प्रवाशांकडून जास्त भाडे आकारल्याचे समोर आले. त्यामुळे असे भाडे आकारणाऱया वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश यादव यांनी दिले होते. त्याप्रमाणे पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून कारवाई करीत आहेत. दोन दिवसांत जास्त भाडे आकारणाऱया 16 खासगी वाहनचालकांवर कारवाई करून 39 हजार रुपयांचा दंड वसूल केला.