
सामना प्रतिनिधी, मुंबई
जवळची भाडी नाकारणे, जादा भाडे घेऊन प्रवाशांशी हुज्जत घालणे अशा प्रकरणांत वडाळा आरटीओने ऑगस्ट महिन्यात कारवाई करीत 52 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. ऑगस्ट महिन्यात प्रवाशांकडून ऑटो रिक्षाचालकांच्या विरोधात 65 तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 24 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून त्यांच्यावर लायसन्स जप्त करणे, दंड आकारणे अशा विविध स्वरूपाच्या कारवाई करण्यात आल्या.
प्रवाशांच्या तक्रारीसाठी आरटीओचा 1800220110 हा टोल फ्री क्रमांक आहे. तसेच लेखी आणि ई-मेलवरूनही तक्रारी दाखल केल्या जातात. त्या तक्रारीच्या आधारे आरटीओचे ‘वायुवेग’ पथक कारवाई करते. वडाळा आरटीओने 1 ते 31 ऑगस्टदरम्यान अशाच रिक्षाचालकांवर कारवाई केलेली आहे. या कारवाईत 52 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याशिवाय 24 जणांची अनुज्ञप्ती तर 24 जणांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
summary- action against auto rickshaw drivers in wadala



























































