
राज्यात आदिवासी भागांमध्ये होणारे अनधिकृत धर्मांतर रोखण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असून नंदुरबार जिल्ह्यात अतिक्रमित जमिनींवर उभारलेले अनधिकृत चर्च तोडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये, विशेषतः नवापूर तालुक्यामध्ये मोठय़ा प्रमाणात आदिवासी व बिगर आदिवासी समुदायातील व्यक्ती व कुटुंबे यांचे खिस्ती धर्मगुरू, मिशनरी व संस्था यांच्याकडून प्रलोभन तसेच आमिष दाखवून धर्मांतर करण्यात येत असल्याचे भाजपचे अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले. त्याला उत्तर देताना आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी विशेष योजना राबवून अशा धर्मांतरित आदिवासींना पुन्हा मूळ धर्मात आणले जाईल. त्यासाठी आदिवासी आमदारांची समिती स्थापन करून निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले.