शाळांच्या परिसरात पानटपऱ्यांवर कारवाई

शाळा, महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई असतानाही नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना मादक पेय, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. परिमंडळ-5 अंतर्गत कोप्ता कायद्यांतर्गत पोलिसांनी 56 पानटपऱ्या जमीनदोस्त करून एकूण 111 कारवाया केल्या आहेत. परिमंडळ-5 चे उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क, धारावी, शाहूनगर, माहीम, कुर्ला आणि व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष मोहीम राबवून कारवाई केली.