वाळू चोरी प्रकरणी सात जणांवर गुन्हा, वाळू माफियांचे धाबे दणाणले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवणमध्ये महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरणाची जोरदार कारवाईचा धडाका उठवला आहे. तहसीलदार समीर घारे यांनी कर्ली व कालावल खाडीमध्ये वाळू चोरीप्रकरणी सापडललेल्या 7 होड्यांच्या मालकांवर मालवण पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बेकायदेशीर वाळू व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
मालवणमध्ये कर्ली व कालावल खाडी पात्रात  बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेरी येथील कर्ली नदीच्या खाडीपात्रातील होडी मालक राजन गावडे, संजय डिचोलकर, प्रकाश तावडे, लक्ष्मण राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आचरा मंडळ अधिकारी मिलिंद पारकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जगदिश यशवंत शेडगे, सागर पोयरेकर, राहुल मिसळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक तपास सुरू आहे.