
सामना प्रतिनिधी । नगर
अवैध वाळूउपसा व वाळूचोरीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने धडक कारवाई मोहिम राबवून 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 11 जणांना अटक केली आहे. आरोपीमध्ये राजू मधे (वय 22, चिखलठाण, राहुरी), विलास पारधे (वय 25, रा.राहुरी), दिलीप शिंदे (वय 31, रा.चास,नगर तालुका), रामदास काळनर (वय 31, पारनेर), दिलीप, कान्हा काकडे (रा.शिर्डी,नगर, तुळशीराम बर्डे, अंबादास बर्डे, (दोघे राहणार राहुरी) यांचा समावेश आहे. शेवगाव तातलुक्यातील बाबासाहेब नांगरे (वय 30, रा.पिंगेवाडी), अंजनाथ धोंगडे (वय 19, रा.शिंगोरी,नगर) भाऊसाहेब काकडे (रा.तांदोडी) यांचा समावेश आहे.
अवैध वाळू उपशाबाबत महसूल प्रशासनासह आता पोलिस विभागाने धडक कारवाई मोहिम हाती घेतली आहे. राहुरी व शेववगाव तालुक्यात कारवाई करुन 40 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. राहुरी तालुक्यातमध्ये नदीपात्रातून तीन ट्रॅक्टर ट्रॉली, 2 टेम्पो, अवैधरित्या उपसा केलेली चार ब्रास वाळू असा एकूण 21 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर शेवगाव तालुक्यात हातगाव ते कांबी रोडवर गाड्या आढळून आल्या. यामध्ये 18 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन दोन डम्पर व सहा ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक गोकूळ अवताडे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, दिनेश मोरे, मयुर गायकवाड, अशोक गुंजाळ, संतोष लोंढे, राहुल सोळंके, राम माळी, रविंद्र हुगांसे, संभाजी कोतकर, बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.































































