नगरमध्ये वाळू चोरी करणाऱ्या 228 वाहनांवर कारवाई

467

नगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि चोरी करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानंतर जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत 228 वाहनांवर कारवाई केली असून 1 कोटी 43 लाख 78 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळूचा विषय अनेक दिवसांपासून गाजत आहे. वाळू उपशाविरोधात जिल्हा महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत नगरमध्ये 15, नेवासा 18, पाथर्डी 1, शेवगाव 21, श्रीगोंदा 18, पारनेर 5, संगमनेर 7, अकोले 8, कोपरगाव 45, राहता 10, श्रीरामपुर 7, राहुरी 37, कर्जत 32, जामखेड 11, अशी एकूण 228 वाहने महसूल प्रशासनाने पकडली आहे. यामध्ये दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली असून यामध्ये नगर मधून 3,27,001 नेवासातून 11 लाख 80 हजार, पाथर्डीमधून 1,15,000 शेवगावमधून 25,000, श्रीगोंदातून 4 लाख 6 हजार, संगमनेरमधून 2,21,001, अकोल्यातून दहा लाख 22 हजार, कोपरगावातून 50 लाख 95 हजार, राहतामधून आठ लाख आठ हजार, श्रीरामपूरमधून 2 लाख 26 हजार, राहुरीतून 8 लाख 4 हजार, कर्जतमधून 26 लाख 11 हजार, जामखेडमधून 4,83,000 असा एकूण एक कोटी 43 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अवैध वाळू प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत 34 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आरटीओकडे 40 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या