
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या गुन्हेगारांविरूद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्याअनुषंगाने परिमंडळ चारमधील 14 सराईतांना एकाचवेळी तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. सराईतांसह संघटीत गुन्हेगारी करणार्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.
पोलीस आयुक्तालयातंर्गत परिमंडळ चारच्या विविध पोलीस ठाण्यातंर्गत सराईतांविरूद्ध तडीपार कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दंगा,दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, महिलांवरील अत्याचार, बेकायदा शस् त्रजवळ बाळगणे, अवैध जुगार चालविणे,अवैध दारुविक्री करणे व अंमली पदार्थ विक्री करणारे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांचा समावेश आहे.
मनोज भगवान कांबळे (वय 48, रा. यशवंतनगर येरवडा), ईस्माईल रियाज शेख, देवीबाई रमेश राठोड (वय 45), सुमन मोहन नाईक (वय 50), भारती कृष्णा चव्हाण (वय 32), कमल राजु चव्हाण, लक्ष्मी गोपाळ पवार (वय 46), मोहित ऊर्फ बिटया संजय सुर्यवंशी (वय 23, सर्व रा. येरवडा), सुरज ऊर्फ गुंडया मनोहर माचरेकर (वय 40, रा. विश्रांतवाडी), दिलीप गोविंद सुर्यवंशी (वय 31, रा.काशीद चाळ कळस विश्रांतवाडी), विवेक चंद्रकांत चव्हाण (वय 27, येरवडा), गौरव दिपक मिसाळ (वय 21, इंदिरानगर वसाहत खडकी), नागनाथ संभाजी गिरी ( वय 19, रा. खराडी), जावेद जानशा शेख (वय 53, रा.मंजाळकर चौक वडारवाडी) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवण्यासाठी संबंधीत पोलीस ठाणे स्तरावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी प्रस्तावाची चौकशी केली. त्यानुसार 14 गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हयातुन तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्ता रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.






























































