
अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदार देबाश्री रॉय यांनी अखेर पक्षाला रामराम करत राजीनामा दिला आहे. त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. तृणमूल काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं त्या नाराज होत्या. अखेर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याआधी त्या तृणमूलच्या तिकिटावरून दोनवेळा आमदार झाल्या आहेत.
तृणमूल कांग्रेस की विधायक देबाश्री रॉय ने पार्टी से इस्तीफ़ा दिया।
— ANI_HindiNews (@AHindinews) March 15, 2021
तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्या आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर चर्चा सुरू आहे. कोणत्या पक्षाकडून लढणार हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
याआधी देखील तृणमूल काँग्रेस पक्षातील बड्यानेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुका आल्या की लोक ये-जा करतात असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.




























































