
कुसुम या गाजलेल्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता अनुज सक्सेनाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुंतवणूकदारांचे 141 कोटी रुपये बुडवल्याच्या आरोपाखाली त्याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागाने अटक केली आहे.

अनुज हा एल्डर या औषध निर्माता कंपनीचा सीईओ आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांचे 141 कोटी रुपये अनुजने बुडवल्याची तक्रार त्याच्याविरोधात करण्यात आली होती. अनुजने 2012 साली त्याच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना योग्य मोबदला दिल्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
अनुजने कुसुम या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो कुमकुम, कुछ पल साथ तुम्हारा, सारा आकाश या मालिकेत दिसला होता.

































































