ज्येष्ठ अभिनेते अरुण बक्षी यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये बॉलिवूड अभिनेत्यांचा राजकीय पक्षांमधील प्रवेश सुरूच आहे. बॉलिवूडचा मोठा पडदा आणि टीव्हीवरील छोटा पडदा आपल्या विविध भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण बक्षी यांना शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेते अरुण बक्षी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश करताना बक्षी यांना मोदींप्रती आपले विचार प्रकट करताना म्हटले की, ‘मोदी हे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व असून दिवसातील केवळ पाच तास ते झोपतात. त्यांच्यात देशासाठी काम करण्याची उर्मी आहे आणि देशाला जास्तीत जास्त वेळ देण्याची त्यांची नेहमीच इच्छा असते.’

अरुण बक्षी यांनी ‘कयामत’, ‘हिना’, ‘हिंद की बेटी’ यासारखे चित्रपट आणि ‘देख भाई देख’ या चित्रपटामध्ये आठवणीत राहणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. मुळचे पंजाबमधील असणाऱ्या बक्षी यांनी 1981 मध्ये आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली होती. बक्षी यांना आतापर्यंत 100 पेक्षा जास्त हिंदी चित्रपट केले आहेत. अनेक चित्रपटांमधील त्यांची व्हिलनची भूमिका गाजली आहे.