
बॉलिवूड तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Sad to hear about the demise of actor Major Bikramjeet Kanwarpal this morning due to #Covid.
A retired army officer, Kanwarpal had played supporting roles in many films and television serials.
Heartfelt condolences to his family & near ones.ॐ शान्ति !
— Ashoke Pandit (@ashokepandit) May 1, 2021
प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी बिक्रमजीत यांच्या निधनाबाबत ट्विट केले आहे.’ अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधन झाल्याचे ऐकून दुख झाले. एक निवृत्त लष्करी अधिकारी कंनवरपाल यांनी अनेक चित्रपटात व मालिकेत सहअभिनेत्याच्या भूमिका केल्या आहेत”, असे अशोक पंडित यांनी ट्विट केले आहे. दिग्दर्शक विक्रम भट अभिनेता रोहीत बोस रॉय यांनी देखील त्यांच्या निधनावर दुख व्यक्त केलं आहे.
बिक्रमजीत यांनी 2003 साली पेज थ्री या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक मालिकामध्येही ते झळकले आहेत.





























































