25 वर्षानंतर ‘अमोल पालेकर’ करणार कमबॅक

1646

गोलमाल, छोटीसी बात आणि चित्तचोर सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारे जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर 25 वर्षानंतर कमबॅक करणार आहेत. संध्या गोखले लिखित ‘कुसूर’ या नाटकातून ते चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. या नाटकात अभिनयासह ते सध्या गोखले यांच्यासोबत दिग्दर्शन ही करणार आहेत.

नाटकात अमोल हे निवृत्त एसीपीच्या भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाबद्दल सांगताना ते म्हणाले की, ‘तेज भागवत यांची ही गोष्ट आपल्याला विचलित करून टाकणारी आहे. ही गोष्ट आपल्या अपेक्षेच्या उलट आहे. नाटकाच्या सुरुवातीपासून ते नाटकाच्या शेवटपर्यंत याची गोष्ट प्रेक्षकांच्या मनात फिरत राहते.’ ते पुढे म्हणाले की, ‘एक कलाकार म्हणून या वयात ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. कारण हे पात्र निभावण्यासाठी जबरदस्त भावनिक आणि शारीरिक उर्जा असणे आवश्यक असते.’ अमोल पालेकर येत्या 24 नोव्हेंबर रोजी 74 वर्षाचे होतील. याच दिवशी मुंबईतील टाटा थिएटर, एनसीपीएमध्ये या नाटकाचे प्रीमियर होणार आहे.

अमोल पालेकर यांनी 1971 साली मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर ते बॉलिवूडकडे वळले आणि 1974 साली बासु चटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ या चित्रपटात त्यांनी काम केले. या चित्रपटानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. अमोल पालेकर यांनी अनेक चित्रपटात दिग्दर्शनही केले आहे. ज्यात कच्छी धूप, नकाब आणि पहेली सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या