दिव्यांका त्रिपाठी करणार जबरदस्त स्टंट

छोटय़ा पडद्यावरची लोकप्रिय सून दिव्यांका त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांपासून दूर होती. लवकरच ती ‘खतरो ला खिलाडी’च्या 11व्या सिझनमध्ये दिसेल अशी चर्चा आहे. सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून ती जबरदस्त स्टंट करणार आहे. अलीकडेच दिव्यांकाने ‘खतरो ला खिलाडी’मध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासंदर्भात तिची चर्चा सुरू असल्याचेही समजले होते. मात्र स्लिप डिस्क आणि पोहता येत नसल्याने तिची इच्छा पूर्ण होईल की नाही याबद्दल शंका होती. दिव्यांकाने ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार’ या टॅलेंट शोपासून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘बनू मै तेरी दुल्हन’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती.

आपली प्रतिक्रिया द्या