
सामना ऑनलाईन । मुंबई
महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याचा आरोप असलेला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता करण ओबेरॉय याला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पन्नास हजाराच्या जात मुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अभिनेता करणने एका ज्योतिषी असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्काराचा व्हिडीओ तयार करून पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच पैसे न दिल्यास पीडितेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.






























































