अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता कुशल पंजाबीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

कुशलने मॉडेलिंगमधून करीयरला सुरुवात केली. त्याने काही छोटय़ा मालिकांमध्येही काम केले होते. 2015 मध्ये त्याने परदेशी महिलेशी विवाह केला होता. तो वांद्रे येथील घरात एकटाच राहत होता. गेल्या काही दिवसांपासून कुशल हा नैराश्यात होता. गुरुवारी दुपारी कुशलचे कुटुंबीय त्याला मोबाईलवर फोन करत होते, मात्र कुशल कोणाचाच फोन घेत नव्हता. कुटुंबीयांनी त्याच्या मित्राला कुशल फोन घेत नसल्याची माहिती कळवली. त्यानंतर त्याचा मित्र वांद्रे येथील कुशलच्या राहत्या घरी गेला. त्याने बनावट चावीने दरवाजा उघडला तेव्हा कुशलने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दीड पानाची सुसाईड नोट

घटनास्थळी पोलिसांना एक दीड पानाची सुसाईड नोट सापडली आहे. आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. आपल्या संपत्तीमध्ये (सदनिका आणि मोटारबाईक ) 50 टक्के रक्कम ही कुटुंबीयांना आणि उर्वरित रक्कम ही मुलाला द्यावी असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. कुशलच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.यापूर्वी अभिनय क्षेत्रात काम करणारे गुरुदत्त, दिव्या भारती, जिया खान आणि प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केल्याची नोंद आहे.