
स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलेले अभिनेते किरण माने यांनी रविवारी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला. किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर मोठा वाद झाला होता. मी राजकीय मत मांडत असल्याने मला मालिकेतून काढल्याचा आरोप माने यांनी केला होता. तर मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या वागणूकीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.
View this post on Instagram
किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच त्यांच्या विरोधातील लोकांना चांगलाच टोला लगावला आहे. बिग बॉसच्या घरात जाताच त्यांनी बिगबॉसचे आभारा मानले व ते म्हणाले. ”“इंडस्ट्रीतल्या काही कारस्थानी लोकांनी माझ्यावर अन्याय केला. मला स्क्रीनपासून वंचित ठेवलं होतं. माझा कॅमेरा हिरावून घेतला होता. ६ महिने माझा जीव तडफडत होता. आज माझ्यासाठी अडीचशे कॅमेरे लावलेत बिग बॉसनी माझ्यासाठी. या किरण मानेसाठी. धन्यवाद बिग बॉस खूप छान वाटतंय.”
कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठीचे चौथे पर्व रविवारी सुरू झाले. रविवारी संध्याकाळी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमियर पार पडला. अभिनेते किरण माने, अभिनेत्री आणि लावणी कलावंत मेघा घाडगे, सर्वांची लाडकी शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर, अभिनेता निखिल राजेशिर्पे, ‘मिसेस मुख्यमंत्री’ फेम अभिनेत्री अमृता धोंगडे, अभिनेत्री यशश्री मसुरकर, रुचिरा जाधव, अमृता देशमुख, अभिनेता प्रसाद जवादे, डान्सर विकास सावंत, डॉ. रोहित शिंदे, अभिनेता- मॉडेल त्रिशूल मराठे, समृद्धी जाधव, ‘रोडिज’ फेम योगेश जाधव हे बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवारी-रविवार रात्री 9.30 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.
View this post on Instagram


























































