प्रभासने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त चाहत्याची शेवटची इच्छा, शूटिंग अर्धवट सोडून घेतली भेट

बाहुबली फेम अभिनेता प्रभास याचे देशासह जगभरात असंख्य चाहते आहेत. अभिनयासोबत प्रभासचा साधेपणा आणि विनम्र स्वभावामुळेदेखील चर्चेत असतो. नुकतीच त्याने आपल्या कॅन्सरग्रस्त चाहत्याची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. आपले शूटिंग अर्धवट सोडून त्याने चाहत्याची भेट घेतली आहे.

वेम्पा कासी राजू या व्यावसायिकाने एका मुलाखतीत ही घटना सांगितली. राजू हे प्रभासच्या भीमावरम या गावचे आहेत. त्यांचा 20 वर्षांचा कर्करोगग्रस्त मुलगा मृत्यूशी शेवटची झुंज देत होता. त्यावेळी त्याने प्रभासला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हे कळताच प्रभासने त्याच्या चित्रपटाचे शूटिंग सोडून त्या चाहत्याची भेट घेतली. त्यामुळे त्या चाहत्याला जगण्याची नवी उमेद मिळाली. कॅन्सरपीडित मुलगा हा दोन तासांपेक्षा जास्त वेळ जगू शकणार नाही असे डॉक्टरांनी संगितले होते. पण प्रभासच्या भेटीनंतर 10 दिवस त्याच्या आयुष्यात वाढ झाली असे बोलले जाते. ‘प्रभास हा फक्त पडद्यावरचा नाही तर खऱया आयुष्यातील हीरो आहे,’ असे राजू यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या