
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तब्बल आठ दिवसाने त्यांना रुग्णालयाने डिस्जार्ज दिला आहे.
92 वर्षीय प्रेम चोप्रा यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना 8 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रेम चोप्रा यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी कळताच, त्यांचे मित्रपरिवार आणि चाहते खूप चिंतेत पडले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत होते. आता, त्यांच्या डिस्चार्जच्या बातमीने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.





















































