
अभिनेता रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषि कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रणधीर यांनी त्वरित रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
राजीव कपूर यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘राम तेरी गंगा मैली’. या चित्रपटातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्याव्यक्तिरिक्त एक जान है हम (1983) या चित्रपटातही ते झळकले होते. त्यांनी प्रेमग्रंथ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली होती. त्यांच्या वहिनी अभिनेत्री नीतू कपूर यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.























































