आईने पियानो वाजवल्याने झोप खराब झाली, अभिनेत्याने डोक्यात गोळ्या घालून केली हत्या

नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध शो रिवरडेल मधील अभिनेता रायन ग्रॅन्थम याला त्याच्या आईच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रायन याने सहा महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या आईचा खून केल्याचे न्यायालयात कबूल केले होते. आता त्याला न्यायालयाने 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कॅनडातीस वैकूवर येथील ब्रिटीश कोलंबिया सर्वोच्च न्यायालयाने रायनला ही शिक्षा सुनावली आहे. रयान याची आई तो झोपलेला असताना पियानो वाजवत होती. त्यामुळे तो वैतागला व त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात रयानची आई जागीच ठार झाली. त्यानंतर पोलिसांनी रयानला आईच्या हत्येप्रकरणी अटक केली. रयानने आईची हत्या करतानाचा व्हिडीओ देखील त्याच्या गोप्रो कॅमेरावर शूट केला आहे.

आईची हत्या केल्यानंतर रायनने बियर प्यायला. त्याने ड्रग्जही घेतले होते. त्यानंतर तो आईच्या मृतदेहाशेजारी बसून नेटफ्लिक्सवरच्या वेब सिरीज पाहिल्या व नंतर झोपायला निघून गेला. त्याआधी त्याने घरातीन एका चादरीने आईचा मृतदेह झाकून ठेवला.

कॅनडाच्या पंतप्रधानांना मारायचे होते

रयान ग्रँथमला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांना देखील मारायचे होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.