अभिनेता समीर शर्माची आत्महत्या

892

अभिनेता समीर शर्मा याने राहत्या घरी गळफास लाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मालाड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

हिंदी मालिकांमध्ये काम केलेले समीर शर्मा हे मालाडच्या चिंचोली बंदर येथील एका सोसायटीत सहा महिन्यापासून भाडय़ाने राहत होते. बुधवारी रात्री समीरच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने याची माहिती मालाड पोलिसांना दिली. काही केळात मालाड पोलीस घटनास्थळी पोहचले. समीरने किचन मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी समीरचा मृतदेह शक विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्याने दोन-तीन दिवसा अगोदर आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर काही गोष्टी समोर येतील.

एका महिन्यात चार आत्महत्या
महिनाभरात चार कलाकारांनी आत्महत्या केल्याने बॉलिवूड सुन्न झाले आहे. मॅनेजर दिशा सालियन, अभिनेता सुशांत सिंह, क्राइम पेट्रोलची अभिनेत्री प्रेक्षा मेहता यांच्या पाठोपाठ समीर शर्मानेही आत्महत्या केली. शिवाय टिकटॉकस्टार श्रेया कक्कड हिनेही आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या