‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ फेम अभिनेत्याची आत्महत्या

1365

‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता समीर शर्मा याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मालाड मधील घरात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. समीरने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या इमारतीत फ्लॅट भाड्याने घेतला होता.

sameer-sharma

समीरने छोट्या पडद्यावर ‘कहानी घर घर की’, ‘क्योंकी की सास भी कभी बहू थी’, ‘ये रिश्ते हैं प्यार के’, ‘ज्योती’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या