टीव्ही अभिनेत्याची तब्येत बिघडली, सिंटाने केले मदतीचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार वर्मा यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. शिवकुमार हे सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या घरची परिस्थिती देखील बेताची आहे. त्यामुळे सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने शिवकुमार वर्मा यांना मदत करण्याचे आावहन सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनिल कपूर, विद्या बालन, सनी देओल यांना केले आहे.

शिवकुमार वर्मा हे क्रॉनिक ऑबस्ट्रेक्टिव्ह पल्मोन डिसीज या दुर्धर आजराने ग्रस्त आहेत. हा एक फुफ्फुसाचा आजार असून शिवकुमाार यांची प्रकृती नाजूक आहे. ते सध्या व्हेंटिवलेटरवर आहेत. सिंटाने याबाबत ट्विट करत मदतीचे आवाहन केले आहे. शिवकुमार यांच्या मदतीसाठी सिंटाने पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

काही दिवसांपूर्वी दिवंगत अभिनेता फराज खान याच्यासाठी अभिनेत्री पूजा भट्ट हिने देखील मदतीचे आवाहन केले होते. मेहेंदी, फरेब अशा चित्रपटांमध्ये मुख्य भुमिका केलेला अभिनेता फराज खान याला ब्रेन इन्फेक्शन व न्यूमोनिया झालेला. त्याच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. फराजवरील उपचारांसाठी तब्बल 25 लाखांचा खर्च येणार होता. त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. फराजची कोस्टार राहिलेली अभिनेत्री पूजा भट्ट हिने देखील सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना फराजला मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र फराजची ही झुंज अपयशी ठरली. त्यांचे 4 नोव्हेंबर रोजी निधन झाले.