
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडमधल्या कलाकारांच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट ही हल्ली मीडियामुळे लगेच व्हायरल होत असते. एखादी अभिनेत्री डॉक्टरकडे जरी गेली तरी ती गरोदर असल्याच्या वावड्या उठायला सुरुवात होतात. अशा वातावरणात अभिनेत्री गुल पनाग हिने तिची प्रेग्नेन्सी तर लपवलीच पण तिचा मुलगा सहा महिन्याचा होईपर्यंत तिने कुणालाच कानोकान खबर लागू दिली नाही. नुकतंच एका मुलाखतीत गुल पनागने ती आई झाली असल्याचे सांगितले, मात्र तिचा मुलगा चक्क सहा महिन्याचा झाल्याचे समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

गुल पनाग हिने २०११ साली तिचा बॉयफ्रेंड रिशी अट्टारीसोबत लग्न केले होते. या दोघांना सहा महिन्यांपूर्वी एक मुलगा झाला असून त्यांनी त्याचे नाव निहाल असे ठेवले आहे. ‘रिशी आणि मला कायम आमचे खासगी जीवन मीडियापासून लांब ठेवायला आवडते. आई वडील होणे हा एक सुंदर अनुभव असतो त्यामुळे कुणाच्याही गोंधळाशिवाय, लोकांच्या चर्चेशिवाय आम्हाला हा अनुभव घ्यायचा होता. त्यामुळे आम्ही हे गुपित ठेवले, असे गुल पनागने या मुलाखतीत सांगितले.
या मुलाखतीत तिने तिच्या प्रसूतीच्या अनुभवाविषयीही सांगितले. ‘निहाल हा प्रिमॅच्युअर जन्मल्याने त्याचे वजन फार कमी होते. पण आता तो अगदी सुदृढ आहे. आता मी देखील माझे वजन कमी केले आहे’, असे तिने सांगितले.
summary : Gul Panag reveals that she has a six month old son and how she kept it a secret!

























































