अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पतीला अटक, समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

622

सामना प्रतिनिधी । मुंबई

अश्लील टिप्पणी, शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेत्रीच्या पतीला समता नगर पोलिसांनी अटक केली. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

रविवारी तक्रारदार आणि अभिनेत्री यांनी समता नगर पोलीस ठाणे गाठले. पती दारूच्या नशेत मारहाण करत असायचा असे अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले. तसेच घरात कोणी नसताना तो अश्लील टिपणी करायचा. तसेच मोबाईलवर मॉडेल्सचे अश्लील फोटो दाखवत असायचा असे अभिनेत्रीच्या मुलीने पोलिसांना सांगितले. समता नगर पोलिसांनी या दोघींचे जबाब नोंदवून घेतले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अभिनेत्रीच्या पतीला चौकशीकरिता बोलावले. त्याची काही तास चौकशी केली. चौकशीनंतर त्याला समता नगर पोलिसांनी अटक केली. अटक करून आज त्याला न्यायालयात हजर केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे. तो विश्लेषणासाठी कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या