अभिनेत्री नताशा सूरीला झाली कोरोनाची लागण

1027

देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा 21 लाख पार गेला असून अनेक नेते, अभिनेते हे देखील याच्या विळख्यात अडकले आहेत. यात आणखी एक नाव आता अभिनेत्री नताशा सूरी हिचे समाविष्ट झाले आहे. नताशा हिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिची भूमिका असणारा ‘डेंजरस’ हा चित्रपट14 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, मात्र आता तिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने ती या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात उपस्थित राहू शकणार नाही.

मी ऑगस्टच्या सुरुवातीपासून आजारी आहे. 1 ऑगस्टला काही कामानिमित्त पुण्याला गेले होते, आणि त्याच ठिकाणी मला कोरोनाची लागण झाली असावी, असे नताशाने सांगितले. तसेच माझ्यामुळे माझी बहिण आणि आजीलाही याची लागण झाली असावी. ते देखील आजारी आहे, मात्र चांगली गोष्टी ही आहे की आम्ही हळूहळू ठीक होत आहोत, असेही तिने यावेळी सांगितले.

तसेच कोरोनाची लागण झालीय यामुळे मला माझ्या ‘डेंजरस’ या चित्रपटाच्या प्रमोशनला जाता येणार नाही. हा चित्रपट 154 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. माझे सहकलाकार बिपाशा बसू आणि करणं सिंह ग्रोव्हर यांच्यासोबत प्रमोशन करण्यास उत्सुक होती, मात्र कोरोनामुळे हे शक्य नाही, असेही नताशाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या