नेहरूंबद्दल वादग्रस्त व्हिडीओ; अभिनेत्री पायल अटकेत

1133

काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याबद्दल एका व्हिडीओतून आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलीसांनी आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली अटक केली आहे. पायलने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

ती म्हणाली, राजस्थान पोलिसांनी मला मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडीओ बनवल्याप्रकरणी अटक केली आहे. हा व्हिडीओ मी गुगलवरून मिळालेल्या माहितीनुसार बनवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करी झाली असे म्हणत तिने पंतप्रधान आणि गृह मंत्रालयाला टॅग केले आहे. पायलच्या या वादग्रस्त व्हिडीओमुळे राजस्थानातील बुंदी जिह्यातील कार्यकर्त्यांनी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पायलच्या जामीन अर्जावर उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या