
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी भाषा दिनी एक खास व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ तिच्या लेकीचा म्हणजे कावेरीचा आहे. ‘आमच्या घरी 12 महिने मराठी भाषा साजरी होते,’ अशी कॅप्शन सोनालीने लिहिली आहे. व्हिडीओमध्ये सोनालीच्या घराच्या भिंतीवर फळा दिसतोय. त्या फळ्यावर मराठी शब्द आहेत. कडुलिंब, श्रीखंड, गुढीपाडवा, चैत्रगौर, नववर्ष… कावेरी हे शब्द वाचून दाखवताना दिसत आहे. मुलीला मराठीचे धडे देणाऱ्या सोनालीचे नेटीजन्स कौतुक करत आहेत.

























































