सनी लिओनी करतेय ‘सोशल डिस्टनसिंग’ची प्रॅक्टिस, फोटो केला शेअर

1208

जगभरात कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू असून बॉलीवूडलाही याचा मोठा फटका बसला आहे. अनेक प्रोजेक्ट सध्या लटकलेले आहे. त्यामुळे कलाकार हिंदुस्थानमध्ये किंवा विदेशात आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीही सध्या यूएसमध्ये आहे. तिथे सनी सोशल डिस्टनसिंगचा सराव करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने याबाबत माहिती दिली, सोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे. फोटोमध्ये सनीने चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे.

सनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोसोबत लिहिले की, ‘बागेत मी सोशल डिस्टनसिंगचा सराव करत आहे. निसर्गाचे सौंदर्य पाहण्याचा आणि ताजी हवा मिळवण्याचा हा चांगला पर्याय आहे.’ या फोटोत सनी काळ्या रंगाचा मास्क घालून बागेत ताज्या हवेचा आनंद घेताना दिसतेय.

screenshot_2020-05-28-18-07-42-465_com-android-chrome

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सनी लिओनी मुंबईत कुटुंबासोबत होती. लॉकडाऊन काळात तिने टिकटॉकवर व्हिडीओ देखील अपलोड केले. यानंतर अचानक ती पती आणि मुलांसोबत यूएसला निघून गेली.

आपली प्रतिक्रिया द्या