तो मी नव्हेच…! गिलख्रिस्टचा धक्कादायक खुलासा

ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असल्याचे वृत्त समोर येताच क्रिकेट जगतात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा गिलख्रिस्ट अचानक इतका श्रीमंत कसा झाला, असा प्रश्न क्रिकेटप्रेमीच नव्हे तर क्रिकेटपटूंनाही सतावू लागला होता, पण याप्रकरणी खुद्द गिलख्रिस्टनेच ट्विट करीत ‘तो मी नव्हेच’ असे स्पष्ट केले आणि सांगितले की, नामसाधर्म्यामुळे मीच अब्जाधीश असल्याचा लोकांचा समज झाला आणि हा गोंधळ उडाला. सीईओ मॅगझिनने दिलेल्या अहवालात सर्वात श्रीमंत असलेला अॅडम गिलख्रिस्ट एफ 45 फिटनेस फ्रँचाईजीचा मालक आहे आणि तोसुद्धा क्रिकेट खेळत असल्याचे समोर आले आहे.