
हिंदुस्थानी लष्कराला अदानी डिफेन्स अॅण्ड एरोस्पेसने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे 2 हजार प्रहार लाइट मशीनगनची पहिली खेप सुपूर्द केली. या मशीनला ग्वाल्हेरमधील स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्समध्ये तयार करण्यात आले. या मशीनगनची मारक क्षमता 1 हजार मीटरपर्यंत असून प्रति मिनिट 700 गोळ्या झाडण्याची क्षमता आहे. मशीनगनचे वजन 8 किलो असून लांबी 1100 मिमी आहे. या मशीनचा वापर हिंदुस्थान-चीन सीमा आणि हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर करण्यात येईल.




























































