दहापैकी सात नोकरदार पगाराबाबत असमाधानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात नोकरी करणाऱया दहापैकी सातजण मिळत असलेल्या पगारात समाधानी नाहीत. नोकरी बदलताना पगारात कमीत कमी 20 टक्के पगारवाढ मिळायला हवी असे त्यांना वाटते, असा निष्कर्ष एडेको इंडिया सॅलरी गाईड 2024 च्या एका अहवालातून समोर आला आहे. मॅनेजमेंट आणि कमर्शियल इंडस्ट्रीज आणि लॉ प्रोफेशन या दोन इंडस्ट्रीजमध्ये सर्वात जास्त पगार मिळतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन मिळते. अनुभवी कर्मचाऱयांना पंपन्या जास्त पगार द्यायला मागेपुढे पाहत नाहीत, असेही यातून समोर आले आहे. 1 मार्च 2022 पर्यंत सरकारी विभागात 9,64,359 पदे, भारतीय रेल्वेत 2,50,965 पदे, शिक्षकांची 7,47,565 पदे, पर्ह्स आणि लष्करात 84,866 पदे खाली आहेत.