
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पश्चिम विदर्भाच्या (वर्हाड) सोमवार 7 नोव्हेंबरला दौर्यावर असून ते शेतकर्यांशी संवाद साधणार आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी 11 वाजता तर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे दुपारी 2 वाजता तसेच बुलढाणा तालुक्यातील मढ फाट्यावर दुपारी 4 वाजता हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यात राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत. याचा जाब शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून विचारल्या जात आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी ते घेत असलेल्या रोखठोक भूमिकेमुळे मिंधे सरकारला पळताभुई थोडी झाल्याने शिवसेनेची बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील सभा कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत परवानगी नाकारली आहे.
परंतु शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) पदाधिकारी व शिवसैनिक बुलढाणा तालुक्यातील मढ फाट्यावर आदित्य ठाकरे यांच्या शेतकरी संवाद ठेवला आहे. ते मेहकर व मढ येथे शेतकर्यांशी संवाद साधत मिंधे सरकारचा काय समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






























































