
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी शिवालय शाखा, लोअर परळ येथून सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी पदयात्रा सुरू होणार आहे. गीता टॉकीज येथील महानगरपालिका कार्यालयात असणाऱया निवडणूक कार्यालयात 11 वाजता आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे वरळी मतदारसंघात उत्साहाचे वातावरण असून, चला अर्ज भरायला असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.























































