हम तुम्हारे साथ है…! आदित्य ठाकरे यांच्या प्रचारयात्रेला वरळीत जबरदस्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराला रविवारी वेग आला. वरळी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचारफेऱयांना जबरदस्त प्रतिसाद लाभला. हजारो शिवसैनिकांसहित भाजपा आणि रिपाइंचे कार्यकर्ते तसेच वरळीच्या सर्वच भागांतील नागरिक या फेऱयांमध्ये सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी औक्षण करून तसेच पुष्पवृष्टी करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

मुस्लिम बांधवांचा ‘शिवसेना झिंदाबाद’चा नारा
आदित्य ठाकरे यांच्या प्रचारफेरीत मुस्लिम बांधव आणि महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. जिजामाता नगर येथे त्यांची प्रचारफेरी पोहोचली तेव्हा मुस्लिम बांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मुस्लिम महिलांनीही यावेळी ‘शिवसेना…झिंदाबाद’चे नारे दिले.