
पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरोधात नेहमीच पुरघोडी केल्या जातात. पाकडय़ांच्या अधूनमधून पुरापती सुरू असतानाच पेंद्र सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट, हॉकी खेळण्याला परवानगी दिली आहे. सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी समाचार घेत याला आज कडाडून विरोध केला. पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याऐवजी खेळ खेळण्यास दिलेली परवानगी ही अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पायाभूत सुविधांच्या कामांना सिंदूर असे नाव दिले जात आहे. भाजपचे राजकारण सिंदूरभोवती फिरत आहे. हत्याकांडात सामिल असलेले दहशतवादी कारवाया थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याऐवजी केंद्र सरकार बीसीसीआयला लेजेंड्स सामना खेळायला परवानगी देत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत हॉकी आणि क्रिकेट खेळायला सरकारची सहमती असल्याने खरंच भाजप दुटप्पी भूमिकेचा महागुरू असल्याचे सांगत भाजपने देशभक्तीचे प्रमाणपत्र देणे हे लज्जास्पद असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.