दर्जेदार रस्त्यांमुळे वरळीकरांचा प्रवास सुखकर,आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

387

सिमेंट-काँक्रीट आणि अस्फाल्ट रोडमुळे वरळीकरांचा प्रवास लवकरच सुखकर होणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज पांडुरंग बुधकर मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आगामी काळात वरळीत आठ सिमेंट-काँक्रीट आणि आठ अस्फाल्ट रोड तयार केले जाणार आहेत.

वरळीतून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तातडीने विकासकामांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वरळीकरांना खड्डेमुक्त दर्जेदार रस्ते देण्याचा धडाकाच लावण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेच्या माध्यमातून तब्बल 16 दर्जेदार रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार  किशोरी पेडणेकर यांनी दिली. या कामांचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, नगरसेवक आशीष चेंबूरकर, समाधान सरवणकर, माजी आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या