आदित्य ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून घेतला आढावा, आयुक्तांसह शेकडो कामगार-कर्मचार्‍यांचे अविरत काम

1976

राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर  महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने गांधी मार्केट, किंग्ज सर्वल, हिंदमाता आदी ठिकाणांची पाहणी केली.

या दौर्‍यादरम्यान महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेने केलेल्या विविध स्तरीय उपाययोजनांची माहिती दिली. तसेच आयुक्तांनीदेखील  महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांची पाहणी करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व त्या-त्या ठिकाणी अव्याहतपणे कर्तव्यावर असणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांशी व कर्मचार्‍यांशी संवाद साधत त्यांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले. पाहणी दौर्‍यास अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, संबंधित परिमंडळांचे सह आयुक्त/उप आयुक्त, मनपा आयुक्त कार्यालयाचे उप आयुक्त चंद्रशेखर चोरे, संचालक (पायाभूत सुविधा) संजय दराडे, संबंधित सहाय्यक आयुक्त, अधिवारी, कर्मचारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या