जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा नागपुरातून

300

मतदार राजाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांची मने जिंकण्यासाठी शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या यात्रेचा 27 ते 31 ऑगस्ट हा तिसरा टप्पा नागपूर येथून सुरू होत आहे. या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर या दोन जिह्यांना भेट देऊन आदित्य ठाकरे जनतेचे आशीर्वाद घेणार आहेत.

जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्पात जळगाव ते नाशिक तर दुसर्‍या टप्पात सोलापूर व मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, बीड येथील जनतेशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तिसर्‍या टप्प्यात नागपूररामटेक, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा, संभाजीनगर, जालन्यातील जनतेशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. या टप्प्यातआदित्य संवादच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न तरशेतकरी संवादच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या समस्या व सूचना जाणून घेणर आहेत. विजय संकल्प मेळाव्यातून जनतेच्या कामांशी एकनिष्ठ राहून पुन्हा भगवा फडकविण्याचा संकल्प आदित्य ठाकरे करणार आहेत. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी स्वागत सभाही होणार आहेत.

तिसरा टप्पा

27 ऑगस्ट : नागपूर, रामटेक, वर्धा, अमरावती

28 ऑगस्ट : यवतमाळ, वाशीम

29 ऑगस्ट : अकोला, बुलढाणा

30 ऑगस्ट : संभाजीनगर

31 ऑगस्ट : जालना

आपली प्रतिक्रिया द्या