तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत पावसाचा जोर पाहता अकरावीच्या तिसऱया गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया आता 5 ऑगस्टऐवजी 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी हा निर्णय आज जाहीर केला. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या 1 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती.