
राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या रांगेत उभे असणाऱया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रवेशाचे प्रमाणपत्र सादर करण्यास येत्या 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी जाहीर केला.
विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता प्रवेश घेणाऱया पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी ईब्डूएसचे मूळ प्रमाणपत्र, एनसीएलचे मूळ प्रमाणपत्र, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दिनांक 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना येणाऱया अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतला असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ही मुदतवाढ अंतिम असून या नंतर कोणत्याही स्वरूपाची मुदत वाढवून देण्यात येणार नाही याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी.




























































