
प्रसिद्ध गायक अदनान सामी याने काही वर्षांपूर्वी हिंदुस्थानचे नागरिकत्व स्वीकारले. यामुळे त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. आता त्याचा सख्खा भाऊ जुनैद सामी याने त्याच्यावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. जुनैद सामी याने अदनानला स्वार्थी आणि खोटारडा म्हटले असून त्याची पदवीही बोगस असल्याचे म्हटले. तसेच त्याच्या खासगी आयुष्याबाबतही त्याने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
जुनैद सामी याने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून अदनान सामीवर निशाणा साधला. अर्थात काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट झाली, मात्र तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पोस्टमध्ये जुनैदने अदनान सामी याने आपली कारकिर्द घडवण्यासाठी काहीही मदत केली नसल्याचे म्हटले. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
अदनान सामी याचा जन्म 15 ऑगस्ट 1969 रोजी पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील रुग्णालयात झाला होता. माझाही जन्म 1973 रोजी येथेच झाला. त्यामुळे अदनान याचा जन्म इंग्लंड किंवा इतरत्र झाल्याचा दावा खोटा आहे. त्याची पदवीही बोगस आहे. इंग्लंडमध्ये फेल झाल्यानंतर त्याने लाहोरमधून पदवी बनवून घेतली, असे जुनैद सामी याने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच मी प्रतिभावान असूनही त्याने मला कधीच हिंदुस्थानात लॉन्च केले नाही. मी त्याच्यापेक्षा चांगले काम करेन अशी भीती त्याला होती, असा आरोपही जुनैदने केला.
अदनानने हिंदुस्थानचे नागरिकत्व घेतले कारण त्याला मोबदल्यात चांगले पैसे दिले गेले होते. जे पाकिस्तान देऊ शकला नाही. आपली आई हिंदुस्थानी होती, असे अदनान सांगतो. मात्र त्याचा हा दावाही खोटा आहे, असा खुलासाही जुनैदने केला. तसेच छापेमारीदरम्यान अदनानला कॅनडामध्ये तुरुंगवासही झाल्याचेही तो म्हणाला.

अदनानने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्याचा होत्या, असा दावाही जुनैदने केला आहे. या गोष्टीचा मला त्रास झाला. मी माझ्या प्रेयसीसोबत असे कधीच करू शकणार नाही. त्याने 2007-08 मध्ये दुसरी पत्नी सबा गलादेरीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्या. पती-पत्नीमधील गोष्टी फक्त आपापसातच ठेवल्या जातात. अदनानने या डीव्हीडी न्यायालयाला दिल्या होत्या. हे व्हीडिओ सबाच्या प्रियकराने बनवल्याचा दावा अदनानने न्यायालयात केला होता, पण ते सर्व काही खोटे असल्याचे जुनैदने म्हटले. दरम्यान, भावाच्या या दाव्यांवर अदनानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.





























































